दोन वर्षांपूर्वी पानिपतच्या युद्धासंदर्भातील त्यावेळची एक समकालीन बातमी मला एडिनबर्ग, स्कॉटलंड येथून २३ नोव्हेंबर १७६१ रोजी प्रकाशित झालेल्या ‘द कॅलेडोनियन मर्क्युरी’ या वृत्तपत्रात सापडली होती.
बातमी पुढीलप्रमाणे आहे –
“The Maharatta’s, of late so powerful and troublesome, have received a most severe blow from the Patans, in a battle near Delly, the 6th of January last; it is said, near 100,000 of them fell that day.”
मराठी मध्ये या बातमीचे पुढील प्रमाणे भाषांतर करता येईल –
“अलीकडील काळात शक्तिशाली आणि त्रासदायक ठरलेल्या मराठ्यांना पठाणांकडून दिल्लीजवळ झालेल्या लढाईत ६ जानेवारी रोजी जबर धक्का बसला आहे; असे सांगितले जाते की त्या दिवशी जवळपास १,००,००० मराठे धारातीर्थी पडले.”
या बातमीवरुन आपल्या लक्षात येते की त्याकाळी मराठ्यांची भारतीय उपखंडातील ताकत वृद्धिंगत होत होती आणि ही गोष्ट इंग्रजांना निश्चितच कुठेतरी खुपत होती. परंतु त्याचवेळी ते चातुर्याने इंग्लंडहून येथील सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून होते.
बुद्धिप्रामाण्य, Investor, अनुदिनीकार, लेखक, कवी
पुस्तक
(१) संगणकाची गोष्ट (२०१७)
Discover more from Rohan J
Subscribe to get the latest posts sent to your email.