महाराष्ट्र देशाची काळजी घेईल, त्याच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकारणी मागील शंभर वर्षांपासून ‘आपलं ते कारटं, दुसऱ्याचा तो बाबू’ या नीतीचा अवलंब करून राष्ट्रीय राजकारणात मोठे होऊ पहात आहेत. पण ही नीती वापरून त्यांना आजवर कधी यश आले नाही आणि भविष्यातही कधी येणार नाही. कारण घरातल्यांवर अन्याय करून आपण बाहेरच्यांचे मन जिंकू हा त्यांचा भाबडा आशावाद आहे. बाहेरचे केवळ आपला स्वार्थापुरता वापर करून सोडून देतील आणि आजवर त्यांनी नेमके तेच केलेले आहे. दुसरीकडे घरातलेही मनापासून ठामपणे आपल्या पाठीमागे कधी उभे राहणार नाहीत. कारण त्यांना आपल्याप्रति आपुलकी असली, तरी आपण त्यांना परस्पर गृहीत धरावे इतपत ते दुधखुळे नाहीत. त्यामुळेच आजवर कोणा एका नेत्याच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र कधी उभा राहिलेला नाही. जो नेता प्रथम आपल्या घराची, महाराष्ट्र देशाची काळजी घेईल त्याच्याच पाठीशी सबंध महाराष्ट्र प्रचंड ताकदीने, एकजुटीने उभा राहील आणि केवळ तोच नेता उत्तरेत जाऊन निर्विवादपणे पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकेल.

महाराष्ट्राचे राष्ट्रीयत्व

Discover more from Rohan J

Subscribe to get the latest posts sent to your email.